हा ब्लॉग कुणासाठी?

आपणांस फेसबुक पेज कसे काढायचे हे माहित आहे किंवा आपण फेसबुक पेज अगोदरच काढले आहे आणि आता आपण फेसबुक मार्केटिंग करण्याचा विचार करत आहात. आपणांस डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय किंवा सोशल मिडिया मार्केटिंग विषयी माहिती आहे हे गृहीत धरून हा ब्लॉग लिहिला आहे. फेसबुक पेज कसे काढायचे या विषयी आमचा दुसरा ब्लॉग वाचा. हा ब्लॉग वाचून आपल्या फेसबुक पेज ची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी तयार करू शकता. फेसबुक जाहिरातींचे प्रकार आणि तुमच्या स्ट्रॅटर्जी नुसार कोणत्या प्रकारची फेसबुक जाहिरात आपण वापरावी हे पुढील भागात वाचा.

या ब्लॉग मधून काय शिकाल?

1. फेसबुक कश्या प्रकारे पोस्ट दाखवतो? Facebook Post algorithm समजून घ्या.

2. फेसबुक पेज चे महत्वाचे घटक

3. सुरुवातीचे लाईक, Engagement आणि फ्री मार्केटिंग

4. पेड मार्केटिंग – नवउद्योजकांसाठी फेसबुक मार्केटिंग अप्रोच: इनबाउंड मार्केटिंग स्ट्रॅटर्जी

 

सर्वप्रथम हे लक्ष्यात घ्या कि फेसबुकवरून मार्केटिंग करण्याचे अनेक प्रकार आणि अप्रोच आहेत. फेसबुकवरून एक विशिष्ट कन्टेन्ट अनेक प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया कंपनी आपणांस वेगवेगळ्या फेसबुक मार्केटिंग च्या स्ट्रॅटर्जी सुचवू शकतात. शेवटी कमी वेळेत, कमी खर्चात जास्तीतजास्त लोकांपर्यंत तुमचा ब्रँड फेसबुकवरून कसा पोहोचेल आणि तुमच्या कंपनीचे मार्केटिंग उद्दिष्ट कमीतकमी वेळात कसे गाठता येईल हेच महत्वाचे आहे.

जानेवारी २०१९ च्या शेवटी पर्यंत २६ कोटी भारतीयांनी फेसबुकवर अकाउंट बनवलेले आहे. या २६ कोटी फेसबुक यूजर्स पैकी १८ ते ३४ वयोगटातील यूजर्सचा आकडा हा लक्षणीय रित्या वाढतो आहे. फेसबुक वॉल चे लेटेस्ट अल्गोरिदम पाहिल्यास फेसबुक एका यूजर साठी दिवसाला अंदाजे ४०० पोस्ट त्याच्या वॉल वर लोड करतो, फेसबुक यूजर ला त्याच पोस्ट दाखवतो ज्या त्याच्यासाठी most relevant and engaging असतील. म्हणजेच आपण आपल्या ब्रँड साठी जो कन्टेन्ट बनवणार आहे तो जास्तीत जास्त engagement कसा तयार करेल हे पाहणे गरजेचे आहे. पोस्ट ला आलेले लाईक, कमेंट, शेअर, पोस्ट वर झालेले क्लिक्स आणि यूजर ने पोस्ट पाहण्यात घालवलेला वेळ हे फेसबुक engagement चे फॅक्टर आहेत. फेसबुक मार्केटिंगचे बेसिक समजून घेण्यासाठी अगोदर facebook algorithm समजून घेऊयात.  

फेसबुक कश्या प्रकारे पोस्ट दाखवतो? Facebook Post algorithm समजून घ्या

फेसबुकवर अगणित लोक दररोज अगणित पोस्ट तयार करत असतात, त्यामुळे फेसबुक ला यूजर साठी त्याच्या इंटरेस्ट नुसार सर्वात रिलेव्हन्ट पोस्ट दाखवणे गरजेचे आहे. फेसबुक च्या लेटेस्ट अल्गोरिदम चा फॉर्मुला हा News Feed Visibility = Creator X Post X Type X Recency हा आहे. फेसबुक द्वारे जर आपण मार्केटिंग करणार असाल तर एक Entrepreneur म्हणून हा फॉर्मुला समजून घेणे आपणास गरजेचे आहे. फेसबुक चे अल्गोरिदम या दिलेल्या फॅक्टर बरोबरच अजून भरपूर फॅक्टर्स वर आधारित आहे, आणि वेळेनुसार यात बदल होत असतात.

Feed Visibility: म्हणजेच कुठल्या पोस्ट ला किती लोकांपर्यंत फेसबुक घेऊन जाईल आणि हि पोस्ट किती वेळ फेसबुक वर ट्रेंडिंग राहील. यूजर साठी Feed Visibility हि खालील चार फॅक्टर ला एकत्र करून ठरवली जाते.

Creator: पोस्ट कुठल्या पेज ने पोस्ट केली आहे. आणि या पोस्ट करणाऱ्या पेज च्या आधीच्या पोस्ट बरोबर त्या यूजर चे इंटरॅक्शन कसे राहिले आहे.

Post: या पोस्ट ला किती engagement मिळालेले आहे. किती लोकांनी या पोस्ट ला लाईक, कमेंट आणि शेअर केलेले आहे.

Type: या पोस्ट चा टाईप काय आहे, हि पोस्ट लिंक आहे कि व्हिडीओ, इव्हेन्ट आहे कि फोटो पोस्ट केलेला आहे इत्यादी. आणि यूजर ज्या टाईप च्या पोस्ट जास्त पाहतो त्याच टाईप च्या पोस्ट त्याला दाखवण्यात येतात.  

Recency: हि पोस्ट कधी अपलोड केलेली आहे म्हणजेच हि पोस्ट यूजर साठी किती नवीन आहे.

 

स्टार्टअप महाराष्ट्र टीम टिप्स:

सगळे फॅक्टर लक्षात घेता, आपल्या ब्रँड च्या फेसबुक पोस्ट ला जास्तीतजास्त व्हिसिबिलीटी मिळण्यासाठी आपण दिवसाला किती पोस्ट कराव्यात. आपला ग्राहकवर्ग कुठल्या टाईप च्या पोस्ट जास्त पाहू शकतो, सुरुवातील फेसबुक पेज बरोबर आपल्या मित्र-परिवारातील शुभचिंतकांचा फेसबुक ग्रुप देखील तयार करून आपल्या पेज वरील पोस्ट ना कशी engagement वाढवता येईल हे पाहणे गरजेचे आहे.


फेसबुक पेज चे महत्वाचे घटक

आपल्या फेसबुक पेज चा प्रोफाईल पिक्चर सहसा बदलू नका, आणि प्रोफाईल पिक्चर म्हणून तुमच्या कंपनीचा लोगो ठेवा. कारण लोगो हा ब्रँड अपील निर्माण करण्यासाठी खूप गरजेचा आहे, तुमच्या पोस्ट मधून, जाहिरातीमधून तुमचा लोगो अधून मधून ग्राहकांना दिसत राहील याची दक्षता घ्या. पेज चा कव्हर फोटो हा तुमच्या जाहिरातीच्या कॅम्पेन नुसार बदलत राहिलात तर उत्तम. पेज च्या About सेक्शन मधील माहिती पूर्ण भरा, बिझनेस इन्फो या टॅब मध्ये कंपनीचे मिशन काय आहे ते लिहा. Contact Info मध्ये तुमचा फोन नंबर, पत्ता, तुमचे दुकान असल्यास दुकान उघडण्याचा वेळ, ईमेल आणि वेबसाईट जरूर लिहा. प्रत्येक फेसबुक पेज साठी यूजर नेम तयार करता येते आणि कस्टम URL देखील तयार करता येतो, जेणेकरून तुम्ही हा URL वापरून सहजपणे तुमचे पेज शेअर करू शकता. Call to Action द्वारे तुम्ही पेजवर बटन लावू शकता, सर्व्हिस बुक करणे, तुमच्या वेबसाईटवर ग्राहकांना घेऊन जाणे इत्यादी ऍक्शन तुम्ही या बटन द्वारे देऊ शकता. पेज वर जाणारा कन्टेन्ट आणि फोटो, व्हिडीओ च्या डिजाईन मध्ये सुसूत्रता राहू द्या.

फेसबुक पेज कसे तयार करायचे हे जर आपणांस माहित करून घ्यायचे असेल तर आमचा फेसबुक पेज संबंधी ब्लॉग वाचू शकता. 

स्टार्टअप महाराष्ट्र टीम टिप्स:

आपली जर वेबसाईट असेल तर फेसबुक मॅनेजर द्वारे आपल्या फेसबुक पेज चा पिक्सल कोड तयार करा. पिक्सल कोड हा ७ ते ८ ओळींचा असा टेक्निकल कोड आहे जो फेसबुक किंवा तुमच्या फेसबुक पेज वरून तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या ऑडियन्स चा डेटा स्टोर करतो. हा कोड तुम्हाला फेसबुक वरून कॉपी करून वेबसाईटच्या हेडर आणि फुटर मध्ये ऍड करायचा आहे. जेणेकरून फेसबुकवरून तुमच्या वेबसाईटला भेट दिलेल्या लोकांना तुम्ही जाहिरातींद्वारे रिटार्गेट करू शकता. 

 

सुरुवातीचे लाईक, Engagement आणि फ्री मार्केटिंग

जर तुम्ही नवीन फेसबुक पेज तयार करत असाल तर बरोबरच नवीन फेसबुक ग्रुप देखील तयार करा. फेसबुक ग्रुप मध्ये मित्र-परिवार आणि आप्तजणांना ऍड करा, जेंव्हा तुम्ही फेसबुक पेज वरून नवीन पोस्ट टाकाल तेंव्हा या ग्रुप मध्ये अपडेट देत चला. या द्वारे पेज च्या सुरुवातीच्या दिवसातील पोस्ट ना एन्गेजमेण्ट मिळत राहील. सोबत काम करणारे तुमचे मित्र, परिवारातील सदस्य यांना पेज ला इन्व्हाईट करा. सुरुवातीचे 1000 लाईक मिळेपर्यंत त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून तुम्ही पेज इन्व्हाईट पाठवा, फेसबुक मेसेंजर द्वारे आपण इन्व्हाईट पाठवू शकता. जर तुमचा व्यवसाय सुरुवातीपासून असेल तर तुमच्या ग्राहकांना फेसबुक पेज सोबत जोडा. 

स्टार्टअप महाराष्ट्र टीम टिप्स:

फेसबुक वर विविध क्षेत्रानुसार फेसबुक ग्रुप आहेत. तुमच्या क्षेत्रातील सर्वात ऍक्टिव्ह ग्रुप चे मेम्बर व्हा, या ग्रुप च्या ऍडमिन सोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. अंदाजे दररोज ४० ग्रुप मध्ये तुमचा प्रमोशनल मेसेज टाका. वेबसाईट असेल तर मेसेज मध्ये लिंक द्या. गुगल फॉर्म द्वारा फॉर्म तयार करून या ग्रुप मधून इंटरेस्टेड लोकांना हा फॉर्म भरायला लावा. नाव, ईमेल, फोन नंबर आणि शहर ह्या फिल्ड फॉर्म मध्ये न चुकता टाका. अशा प्रकारे फ्री मार्केटिंग द्वारे तुम्ही फेसबुक ग्रुप्स च्या माध्यमातून लीड्स गोळा करू शकता. 

पेड मार्केटिंग – नवउद्योजकांसाठी फेसबुक मार्केटिंग अप्रोच: इनबाउंड मार्केटिंग स्ट्रॅटर्जी

वर सांगितल्याप्रमाणे फेसबुक वर जाहिरात करण्याचे भरपूर प्रकार आहेत. आपण या ब्लॉग मधे इनबाउंड मार्केटिंग स्ट्रॅटर्जी विषयी समजून घेणार आहोत. हि स्ट्रॅटर्जी कमी वेळात जास्त ग्राहक संख्या वाढवण्यासाठी उपयोगाची ठरलेली आहे. आपले उदिष्ट सर्व्हिस किंवा प्रोडक्ट ची ऑनलाईन विक्री करणे असेल तर हि स्ट्रॅटर्जी तुमच्यासाठी आहे. परंतु तुमचे उदिष्ट जर Brand Awareness असेल तर या संबंधी असलेला आमचा दुसरा ब्लॉग वाचा.    

क्वालिटी लीड्स मिळवणे हे यशस्वी विक्रीतंत्राचा सर्वात महत्वाचा भाग आहे.

 

तुमच्या पोटेन्शिअल ग्राहकांनी त्यांची वयक्तिक माहिती जसे कि नाव ईमेल, फोन नंबर तुम्हाला देणे, आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमचे प्रोडक्ट, सर्व्हिस त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे हे लीड जनरेशन जाहिरातींचा उद्देश आहे. तुम्ही जर नवउद्योजक असाल आणि नवीन ब्रँड सुरु करण्याचा प्रयत्न करत असाल तर सुरुवातीचे कस्टमर मिळवणे हे मोठे जिकिरीचे काम होऊ शकते. नवीन ब्रँड यशस्वी होण्यासाठी कमीतकमी वेळात पोटेन्शिअल ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल हे जमणे महत्वाचे आहे. इनबाउंड मार्केटिंग मध्ये ग्राहकाचा प्रवास कशा पद्धतीने होतो हे समजणे फेसबुक मार्केटिंग साठी महत्वाचे आहे: ग्राहकाच्या प्रवासाचे टप्पे खालील प्रमाणे आहेत:

1. Awareness stage: हा पहिला टप्पा आहे, साधारणपणे तुमच्या ब्रँड, सर्व्हिस आणि प्रोडक्ट विषयी अनभिज्ञ असणाऱ्या ग्राहकांना तुमच्या कंपनीची ओळख करून देणे हा या टप्प्याचा उद्देश आहे. तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मधील नाविन्यपूर्ण गोष्टींची माहिती देणारा कन्टेन्ट तुम्हाला या पोटेन्शिअल ग्राहकांच्या गटांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

2. Consideration stage: या टप्प्यावर तुमच्या पोटेन्शिअल ग्राहकांना तुमच्या ब्रँड विषयी माहिती झालेली आहे. तुमचा लोगो अथवा प्रोडक्ट चे फोटो बघितल्यानंतर त्यांना तुमच्या विषयी पूर्वीपासूनच माहिती आहे अशी भावना तयार होते. या टप्प्यावर ग्राहक तुमच्या फेसबुक पोस्ट सोबत engagement करायला सुरु करतात, ते त्यांच्या मित्रांना कमेंट मध्ये टॅग करतात किंवा तुमच्या पोस्ट शेअर देखील करतात. इथे त्यानां तुमच्या प्रोडक्ट, सर्व्हिस विषयी विश्वास तयार झालेला असतो आणि त्यांची वयक्तिक माहिती तुम्हाला ते लीड च्या स्वरुपात द्यायला तयार होतात.

3. Decision stage: हा शेवटचा टप्पा आहे जिथे पोटेन्शिअल ग्राहकांसोबत तुमचे संबंध प्रस्थापित झालेले असतात आणि ते तुमचे ग्राहक होतात.

 

याचा अर्थ असा कि सुरुवातीला जेंव्हा तुम्ही तुमच्या पोटेन्शिअल ग्राहकांचे गट निर्माण करा आणि या गटांना कुठले प्रोडक्ट, सर्व्हिस मार्केट करणार आहात हे ठरवाल. तेंव्हा इनबाउंड मार्केटिंग मधील ग्राहकाचा प्रवास समजून घ्या आणि त्यानुसार तुमच्या ग्राहक गटांसाठी फेसबुक कन्टेन्ट मार्केटिंग स्ट्रॅटर्जी तयार करा. सुरुवातीचे काही महिने ब्लॉग पोस्ट, व्हिडीओ पोस्ट मधून तुमच्या ब्रँड विषयी फेसबुकवर जागरूकता तयार होईल यावर भर द्या. त्यानंतर ऑप्ट-इन फॉर्म्स द्वारे लीड्स गोळा करा अथवा वेबसाईटवरील कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे जास्तीत जास्त लीड्स कशा एकत्र करता येतील यावर भर द्या. आणि मग या एकत्र झालेल्या लीड्स ना वक्तशीरपणे फॉलोअप देऊन तुमच्या ब्रँड साठी यशस्वी विक्री करण्याचा फॉर्मुला शोधून काढा. इनबाउंड मार्केटिंग विषयी अजून समजून घेण्यासाठी आमचे पुढील ब्लॉग वाचत रहा.  फेसबुक वरील लीड जनरेशन च्या जाहिरातीचे प्रकार आणि त्यांचा आपल्या कंपनीचे मार्केटिंग उद्दिष्ट गाठण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे आपण पुढील ब्लॉग मध्ये पाहुयात.

तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग मध्ये योग्य तज्ञ मिळत नसतील तर तुम्ही स्टार्टअप महाराष्ट्र मेंबरशिप घेऊन स्टार्टअप महाराष्ट्र परिवारात असलेल्या फेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग इत्यादी सोशल मार्केटिंग एक्स्पर्ट ना तुमचे Mentors बनवू शकता आणि या चॅनेल्स वरून ऑनलाईन मार्केटिंग करून आपण यशस्वीरीत्या व्यवसाय कसा उभा करू शकतो हे शिकू शकता. 

 

Written By Tushar Pakhare (Co founder at Ghongadi.com & MotherQuilts.com)