या ब्लॉग मधून काय शिकाल?

शक्यतो मराठी नवउद्योजक Indirect Marketing करण्याचा विचार करत नाहीत, लॉंग टर्म मार्केटिंग प्ल्यान करून सिरीज मधे जाहिराती बाजारात उतरवत नाहीत. त्यांना आज रात्री जाहिरात केली आणि उद्या सकाळी कस्टमर मिळावेत असे वाटते, मुळात जाहिरात हा ग्राहकावर दूरगामी परिणाम साधण्याचे मध्यम आहे. तुमच्या ग्राहकाने कुठल्या ओळखी मुळे तुमचे प्रोडक्ट घ्यावे हि ओळख जाहिरात तयार करत असते. नवउद्योजकांनी हे लक्षात घ्यायचे आहे कि जाहिरात बघून लगेच कस्टमर येणार नाहीत, बजेट कमी असेल तर सुरुवातीच्या काळात कस्टमर चा डेटा मिळेल अशा inbound जाहिराती जास्तीतजास्त करण्यावर भर द्या. उदाहरणार्थ फेसबुक वर लीड जनरेशन जाहिराती चालवा, पॅम्प्लेट वर QR Code देऊन पोटेन्शिअल ग्राहकांकडून फॉर्म भरून घ्या आणि त्यांना तुमच्या सेल्स टीम द्वारे संपर्क करून कन्व्हर्ट करा.

 

जाहीरात दोन प्रकारची असते… एक प्रत्यक्ष फायदा (direct effect) मिळविण्यासाठी व दुसरी अप्रत्यक्ष फायदा (indirect effect) मिळविण्यासाठी!

बहुतांश जाहीराती दुसऱ्या वर्गातल्या असतात…

जाहिरात केली म्हणजे लगेच तुमच्याकडे ग्राहकांची रांग लागली पाहिजे असे नसते. जाहिरात मुख्यत्वे केली जाते ती तुमचा ब्रँड लोकांच्या लक्षात राहण्यासाठी. याला indirect effect म्हणतात. लोकांना सारखा सारखा तुमचा ब्रँड नजरेस पडत असेल तर संबंधित वस्तू, सेवा खरेदी करताना ते तुम्हाला सुद्धा विचारात घेतात. तुमची जाहिरात सारखी डोळ्यासमोर असल्यामुळे तुमचा ब्रँड ग्राहकांसाठी ओळखीचा होऊन जात असतो. साहजिकच तुमचे प्रोडक्ट, सेवा जेव्हा त्यांच्यासमोर येते त्यावेळी ते त्यांना नवीन वाटत नाही, आणि कोणतेही आढेवेढे न घेता ते तुमचे प्रोडक्ट, सेवा खरेदी करतात.

लक्स साबण आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. इतक्या वर्षांपासून मार्केटमधे आहे. देशात क्वचितच एखादा सापडेल ज्याला लक्स ब्रँड माहित नाही. मग तरीही ते आजही त्यांची जाहिरात का करतात? ते त्यांचा ब्रँड लोकांच्या डोक्यात घोळत राहील याची काळजी घेतात… सलग वर्षभर जर लक्स ची जाहिरात आली नाही तर तो ब्रँड लोकांच्या विस्मरणात जाईल आणि विक्री कमी होईल. म्हणून जाहिरात केली जाते. जाहिरात पाहून तुम्हीलगेच दुकानात जाऊन लक्स साबण खरेदी करत नाही. ज्यावेळी गरज असेल तेव्हाच खरेदी करता. पण त्यावेळी इतर साबणांसोबत लक्स ब्रँड ची साबण सुद्धा डोक्यात ठेवता. याला आपण अप्रत्यक्ष परिणाम (Indirect effect) म्हणू शकतो.

आता जेव्हा कंपनीला लक्स साबणाची विक्री वाढवायची असेल तेव्हा ते काय करतात? ते एखादी स्कीम काढतात. पाच साबणांवर दोन साबण फ्री. अशावेळी तुमच्या डोक्यात साबण खरेदी करण्याचे नियोजन असेल तर तुम्ही तात्काळ दुकानात जाऊन तो पाच+दोन साबणाचा बॉक्स खरेदी करताल. याला आपण प्रत्यक्ष परिणाम (Direct effect) म्हणू शकतो. तुमची जाहिरात वाचून ग्राहकांना लगेच ती वस्तू सेवा खरेदी करावीशी वाटेल…

मार्केटमध्ये प्रत्यक्ष परिणाम (direct effect) देणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण खूप कमी असते. मुख्य भर हा अप्रत्यक्ष परिणाम (indirect effect) करणाऱ्या जाहिरातींवर असतो. तुम्ही सुद्धा जेव्हा जाहिरात द्याल तेव्हा लगेच रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा करू नका. जाहिरात करत राहा. तुमचा ब्रँड लोकांच्या डोक्यात आपोआपच घट्ट बसतो.

 

एक जाहिरात दिली आणि काही रिझल्ट आला नाही म्हणून लगेच जाहिरात बंद करायची नसते. तुम्ही लोकांसमोर तुमचा ब्रँड नेत राहायचे असते. तुमच्या जाहिरातीचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागतोच, तो वेळ देण्याची तयारी ठेवा. तुमच्या दृष्टीने ग्राहक आले नसले तरी प्रत्यक्षात तुम्ही कित्येक लोकांपर्यंत पोचलेला असता… आणि त्यांना सारखी सारखी जाहिरात दिसत राहिली कि ते तुमच्याकडे येणारच असतात. वेळ लागतोच, पण तो तुमच्या दृष्टीने.. प्रत्यक्षात तुमच्या जाहिरातीने तिचे काम सुरु केलेले असते.

जाहिरात करत रहा. कायम लोकांच्या समोर जात राहा… लोकांच्या डोक्यात तुमचा ब्रँड घट्ट बसेल याची काळजी घ्या… आज जाहिरात आणि उद्या रिझल्ट अशी अपेक्षा करू नका… वेळ लागेल रिझल्ट मिळणारच…

Originally written by – Shrikant Avhad (Udyojak Mitra) / Edited by – Startup Maharashtra Team