इंडस्ट्रीमधे काम केलेल्यांना सुपरवायजर चे महत्व नक्कीच माहित असेल.

तुमच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी नेहमी सुपरवायजर हवा. कर्मचारी हाताळणी हि एक कला आहे. ती ठराविक लोकांनाच जमते. कंपनीत वेगवेगळ्या स्वभावाचे कर्मचारी असतात. प्रत्येकाला त्यांच्या कलेने घेऊन हॅण्डल करणे हे सोपे काम नाही.

उद्योजकाला या कर्मचाऱ्यांना हाताळता आले पाहिजेच परंतु त्याने जास्त काळ हे काम करू नये. कर्मचाऱ्यांकडून मालकाच्या अपेक्षा कधीही पूर्ण होत नसतात. अशावेळी मग मालकाची चिडचिड होते. कर्मचाऱ्यांचा राग इतर कामांवर निघतो. त्यामुळे कार्यक्षमता कमी होते. सारखी सारखी चिडचिड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा नकारात्मकता निर्माण होते. आणि तसंही एकदा व्यवसाय मोठा झाल्यावर कर्मचाऱ्यांवर जातीने लक्ष ठेवणे शक्यच नसते. अशावेळी मग हा सुपरवायजर कामी येतो.

 

सुपरवायजर हा कंपनीचा मालक किंवा उच्चाधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधील बफर झोन म्हणून काम करतो.

 

कर्मचाऱ्यांकडून पूर्ण क्षमतेने काम करून घेणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, लहान लहान समस्या त्याच्याच पातळीवर सोडवणे अशी कामे सुपरवायजर च्या अखत्यारीत येतात. यामुळे उध्धाधीरकऱ्यांपर्यंत / मालकापर्यंत फक्त रिझल्ट जातो त्यातला शीण नाही. आणि यामुळे एकूणच कंपनीची कार्यपद्धती सुरळीत चालते. तुमचा व्यवसाय एकदमच लहान असताना सुपरवायजर चा खर्च पेलवणार नाही, पण व्यवसायात एकदा सुसूत्रता आली आणि बऱ्यापैकी उत्पन्न सुरु झाले कि जमेल तेवढे लवकर कर्मचाऱ्यांना हाताळण्यासाठी सुपारायजर ची नियुक्ती करावी.

 

हा सुपरवायजर तुमचा कंपनीच्या अनावश्यक कामात वाया जाणारा वेळ वाचवेल, तुम्हाला कर्मचारी हाताळणीचा होणारा शीणही कमी करेल, आणि तुम्हाला फक्त रिझल्ट देण्याचे काम करेल. यामुळे अर्थातच तुम्हाला इतर महत्वाच्या कामांवर लक्ष द्यायला वेळ मिळेल, तुमची कार्यक्षमता वाढेल. आणि कार्यक्षमता वाढली कि व्यवसायव्यवसाय वाढतो हा तर बेसिक नियम आहे.

 

एक मात्र लक्षात ठेवा, हा सुपरवायजर कामाशी काम ठेवणारा असावा. सुपरवायजर शिस्तप्रिय असावा. त्याला त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या कामांची पूर्णपणे जण असावी, प्रॅक्टिकल माहिती असावी. त्याच्याकडे चांगले संभाषणकौशल्य असावे. हा खूप खडूस नसावा पण एकदम गोडबोल्याही नसावा. वेळ पडल्यास त्याने कर्मचाऱ्यांना थोडंसं रागवावं आणि कर्मचारी खूपच नाराज झाले इतर तुम्ही त्यांच्याशी थोडे गोड बोलून सुपरवायजर दटावून वेळ निभावून न्यावी अशी स्ट्रॅटेजि असावी.

Originally written by – Shrikant Avhad (Udyojak Mitra) / Edited by – Startup Maharashtra Team